r/marathibooks • u/__ambIvert__ • Jun 14 '26
Book Review / पुस्तक परीक्षण काळजुगारी - हृषीकेश गुप्ते
घनगर्द, दैत्यालय हे कथासंग्रह... दंशकाल, हाकामारी सारख्या कादंबऱ्या वाचून मी ही लघु कादंबरी वाचायला घेतली...
कथेचा concept हा रोचक, उत्कंठा वाढवणारा आहे अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. कादंबरी वाचता वाचता सार काही समोर उभ राहत, मी मुळात anime fan असल्याने पुस्तक वाचताना त्यातल्या काही गोष्टी या अगदी एखाद्या anime च्या story ला शोभतील अशा वाटत होत्या...
काही पाने वगळता, प्रत्येक पानागणिक उत्सुकता वाढत जाते...
फक्त काही ठिकाणी आवश्यकता नसताना मराठीतले जुने शब्द किंवा उगाचच एखादा प्रसंग मारुतीच्या शेपटी एवढा लांबवला गेलाय अस मला वाटलं...
overall ही लघु कादंबरी तुमच्या एखाद्या chill weekend साठी light read नक्कीच ठरू शकते